बस नाम ही काफि है.........देश का अनमोल 'रतन' टाटा जी.,लोकं म्हणतात, ' नाम में क्या रक्खा है |' पण नावातच सगळं काही आहे. डोक्यावर घेऊन मिरवावासा वाटणारा, देशाचा एक अनमोल असा ' दागिना '..... ना कुठल्या पुरस्कारांची गरज, ना कसला मोठेपणा मिळवण्यासाठी धडपड....स्वतःच स्वतःमध्ये एक पुरस्कार, भारताचा गर्व, भारताचा सन्मान, एक महान, चिरतरुण, शांत, संयमी व्यक्तिमत्त्व....आई वडीलांनंतर माणसात देव अनुभवल्याचा कदाचित पहिलाच अनुभव....अबाल-वृद्धांसाठी प्रेरणा, हुरूप....संपूर्णपणे देशाच्या विकासाचा विचार करणारी व्यक्ती....देशाच्या संरक्षणासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी सदैव तत्पर असलेलं दानशूर व्यक्तिमत्त्व..... एकच होते, एकच आहेत, एकच राहतील....